देशमुखांच्या राजीनाम्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री गप्प का? फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (High Court on Parambir Singh Appeal) केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का गप्प आहेत. ते अजूनही का बोलत नाहीत?, असा प्रश्न विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, देशमुखांनी पहिल्यांदा नैतिकता दाखवायला हवी होती. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. हे सरकार जनतेच्या मनातील नाही. तीन पक्ष आपापला अजेंडा चालवत आहेत. पवार यांच्याकडून जनतेच्याही देखील हे लक्षात आले आहे कि ठाकरे सरकार हे बेमानींन आलेले सरकार आहे. महाराष्ट्राची प्रतिमा हि पूर्णपणे खराब होताना दिसतात आहे.

फडणवीस म्हणाले, संजय राऊतांची परिस्थिती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे. सचिन वाझे प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुरवातीलाच देशमुखांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. मात्र मुख्यमंत्री गप्प राहिले. देशमुखांच्या आराजीनाम्याबद्दल मुख्यमंत्र्याना उत्तर द्यावंच लागेल.

You might also like