स्टेट बँक देणार ५ लिटर पेट्रोल मोफत !

SBI
SBI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बँकिंग सेक्टर मध्ये अग्रेसर असलेल्या एसबीआय ने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी ५ लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अट फक्त ही आहे की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन तुम्ही पेट्रोल भरल्यास तुम्हाला याचा लाभ होवू शकतो . या पेट्रोल पंपावर ग्राहकाला ५ लिटर पेट्रोल मोफत मिळेल परंतु त्यासाठी पैसे देताना ‘भीम’ अॅपचा वापर करायचा असून ते एसबीआयच्या खात्यातून करणे गरजेचे आहे. ही ऑफर येत्या 23 नोव्हेंबर 2018 पर्यंतच वैध असणार आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरताना भीम अॅपद्वारे एसबीआयच्या खात्यातून व्यवहार केला तरच ५ लिटर पेट्रोल मोफत मिळू शकणार आहे, अशी माहिती एसबीआयच्या वेबसाईटवर दिली आहे. मात्र काही अटी देखील बँकेकडून ठेवण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे किमान १०० रुपयांचे पेट्रोल ग्राहकाला भरावे लागेल. त्यानंतर भीम अॅपद्वारे केलेल्या या १०० रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून ९२२२२२२०८४ या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. (भीम अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंबर <UPI Reference No. (१२-Digit)> <DDMM> टाईप करून ९२२२२२२०८४ या फोन नंबरवर SMS पाठवा लागणार आहे. शिवाय या SMSसाठी शुल्क भरावे लागेल. या नंतर जर तुमचा नंबर निवडण्यात आला तर तुमच्या मोबाइक क्रमांकावर मेसेजद्वारे सांगण्यात येईल.