नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमानुसार, आता ग्राहक स्टेट बँकेच्या YONO अॅप्लिकेशनमध्ये फक्त त्याच फोन नंबरवरून लॉग-इन करू शकतात जो बँक खात्यात रजिस्टर्ड केला असेल. या नियमानंतर तुम्ही इतर कोणत्याही फोन नंबरवरून बँकेची सर्व्हिस घेऊ शकणार नाही. बँकेचे म्हणणे आहे की, यामुळे ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग फसवणुकीपासून वाचवता येईल.
ऑनलाइन फसवणुकीची वाढती प्रकरणे लक्षात घेता, SBI ने YONO अॅपमध्ये हे नवीन अपग्रेड केले आहे. यामुळे ग्राहकांचे ट्रान्सझॅक्शन पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित होतील आणि ते ऑनलाइन फसवणुकीला बळी पडण्याचे टाळतील.
SBI ने माहिती दिली आहे की, नवीन रजिस्ट्रेशनसाठी, ग्राहकांनी तोच फोन वापरावा जो त्यांनी बँकेत रजिस्टर्ड केला आहे. आता या नवीन नियमानुसार, तुम्ही कोणत्याही फोनद्वारे अॅपमध्ये लॉग इन करू शकत नाही, तर पूर्वीचे ग्राहक कोणत्याही फोनवरून लॉग इन करू शकत होते.
Our OTP based cash withdrawal system for transactions at SBI ATMs is vaccination against fraudsters. Protecting you from frauds will always be our topmost priority.#SBI #StateBankOfIndia #ATM #OTP #SafeWithSBI #TransactSafely #SBIATM #Withdrawal #AzadiKaAmritMahotsavWithSBI pic.twitter.com/G1FpjvP25Q
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 18, 2021
SBI नवीन अपडेट
ATM फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने ATM ऑपरेशन्सची सिक्योरिटी सुधारली आहे. या अपग्रेडनंतर, जेव्हा तुम्ही ATM मधून 10 हजार किंवा त्याहून जास्त रुपये काढण्यासाठी जाल, तेव्हा तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर बँकेकडून एक OTP येईल, जो ATM मशीनमध्ये टाइप करावा लागेल. OTP टाकल्यानंतरच तुम्ही ATM मधून पैसे काढू शकाल. तर 9,999 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे काढणारे OTP सांगावे लागणार नाहीत.
रात्री 8 नंतर सकाळी 8 वाजेपर्यंत 10,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश काढण्यासाठी, मोबाइल फोनवर मिळालेल्या डेबिट कार्ड पिनसह OTP एंटर करणे आवश्यक आहे. ही सुविधा स्टेट बँकेच्या सर्व ATM मध्ये उपलब्ध आहे. SBI नसलेल्या ATM मध्ये OTP आधारित पैसे काढणे उपलब्ध नाही.