विराट कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यासाठी BCCI 4 महिन्यांपासून करत होते प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही आठवड्यांपासून विराट कोहली सतत चर्चेत आहे. टी-20 फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा त्याचा निर्णय, एकदिवसीय कर्णधारपदावरून त्याची झालेली हकालपट्टी आणि त्यानंतर त्याची पत्रकार परिषद या सर्व गोष्टींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबद्दल बरेच काही लिहिले आणि सांगितले गेले, मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा मुद्दा BCCI च्या पदाधिकाऱ्यांच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू होता.

विराट कोहलीने त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेऊन टी-20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याने कसोटी आणि एकदिवसीय संघांचे नेतृत्व सुरू ठेवण्याचा आपला इरादा स्पष्ट केला. आश्चर्याची बाब म्हणजे दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी कसोटी संघ जाहीर करताना BCCI ने रोहित शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीही केली गेली. नंतर BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, कोहलीने BCCI ची टी-20 कर्णधारपद सोडू नये अशी विनंती नाकारली.

त्यानंतर विराटने पत्रकार परिषद घेऊन गांगुलीच्या त्या दाव्यांचे जाहीरपणे खंडन केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला,”कसोटी मालिकेसाठी 8 डिसेंबर रोजी निवड बैठकीच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधण्यात आला. मी टी-20 कर्णधारपदाचा निर्णय जाहीर केल्यापासून 8 डिसेंबरपर्यंत माझ्याशी कोणताही संवाद झाला नाही.”

क्रिकट्रॅकरच्या रिपोर्टनुसार, असे संकेत मिळत आहेत की, विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार बोर्ड अधिका-यांच्या मनात आधीपासूनच होता. त्यामुळे बोर्डाने एकापाठोपाठ एक असे कठीण निर्णय घेतल्याचेही या रिपोर्ट म्हटले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्माला पहिल्यांदा उपकर्णधार बनवण्यात आले होते मात्र त्याच्या दुखापतीमुळे ही जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.

Leave a Comment