SBI Home Loan : आपल्या स्वप्नातील घर असावं असं कोणाला नाही वाटणार? सर्वांचीच ती इच्छा असते, मात्र घर बांधताना आर्थिक बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे. घर बांधायचं म्हणजे काय खायचं काम नाही. त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवं. अनेकजण घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढतात. देशातील अनेक बँका काही अटी आणि शर्तीवर कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI सुद्धा ग्राहकांना अगदी स्वस्तात गृहकर्ज देत आहेत. त्याचा व्याजदर किती आहे आणि २० लाखांचे कर्ज काढल्यावर तुम्हाला किती रुपयांचा मासिक हप्ता बसेल तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्याजदर आणि हप्ता किती – SBI Home Loan
SBI आपल्या ग्राहकांना 8.6 टक्के व्याजदरात गृह कर्ज (SBI Home Loan) उपलब्ध करून देत आहे. जर समजा, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मधून २० लाखांचे गृहकर्ज २० वर्षाच्या कालावधी साठी घेतलं तर तुम्हाला 8.6 व्याजदराने दर महिन्याला 17,483 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. आणि तुम्हाला २० वर्षासाठी एकूण व्याज 21,95,981 रुपये इतकं भरावे लागेल. म्हणजेच 20,00,000 मुद्दल + 21,95,981 व्याज असे एकूण तुमचे 41,95,981 रुपये जातील. परंतु समजा, तुम्ही हे हप्ते भरत भरत कधी कधी एकरकमी काही मोठी रक्कम जमा केली तर तुमचा महिन्याचा हप्ता आणि व्याज दोन्हीही आपोआप कमी होईल. मात्र तुम्ही किती रक्कम भरता यावर हे अवलंबून असेल.
कोणकोणती कागदपत्रे लागतील –
ओळखीचा पुरावा (कोणताही): पॅन/ पासपोर्ट/ ड्रायव्हरचा परवाना/ मतदार ओळखपत्र
राहण्याचा पुरावा / पत्ता (कोणतेही)
मालमत्तेची कागदपत्रे
बांधकाम परवानगी
अर्जदार/च्या सर्व बँक खात्यांसाठी मागील 6 महिन्यांची बँक खाते विवरणपत्रे
वेतन स्लिप किंवा मागील 3 महिन्यांचे वेतन प्रमाणपत्र (SBI Home Loan)
मागील 2 वर्षांच्या फॉर्म 16 ची प्रत किंवा मागील 2 आर्थिक वर्षांच्या आयटी रिटर्न्सची प्रत
पगारदार अर्जदार/सह-अर्जदार/ हमीदारासाठी उत्पन्नाचा पुरावा