हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून गेल्या महिन्यात रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर बँकांनीही आपल्या कर्जावरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांनी FD वरील व्याजदरातही वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान आता सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
15 जुलैपासून नवीन दर लागू
15 जुलैपासून SBI चे हे नवे दर लागू होतील. बँकेकडून 2 कोटींपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. तर बँकेने 1 वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदर कमी केले आहेत.
SBI चे नवीन व्याजदर
7 दिवस ते 45 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दर 3.50 टक्के राहील. बँक आता 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीच्या FD वर 4.00 टक्के व्याजदर देईल. तसेच SBI 180 दिवसांपासून ते 210 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.25 टक्के व्याजदर देईल, तर 211 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD चा व्याजदर बँकेने 4.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.
1 वर्ष मात्र 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर आता 5.25 टक्के व्याजदर मिळेल. ज्यासाठी आधी 4.75 टक्के देण्यात येत होते. SBI कडून आता 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीतील फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.25 टक्के तर 3 वर्षे ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.50 टक्के व्याज देत राहील.
IDBI बँकेनेही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे
IDBI बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सचे व्याजदर वाढवले आहेत. 14 जुलै 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. बँकेकडून 7 दिवस ते 30 दिवसाच्या डिपॉझिट्सवर 2.70 टक्के व्याज दर मिळेल, तर 31 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.00 टक्के व्याजदर मिळेल. बँकेकडून 46 ते 60 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.25 टक्के आणि 61 ते 90 दिवसांच्या डिपॉझिट्ससाठी 3.40 टक्के व्याज दर दिला जाईल. तसेच 91 दिवस ते 6 महिन्यांच्या FD वर आता 4.00 टक्के व्याजदर दिला जाईल.
अनेक बँकांकडून एफडीचे दर वाढवले गेले
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, SBI, पीएनबी यांनी देखील आपल्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/deposit-rates
हे पण वाचा :
Gold Investment : सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा
Income Tax वाचवण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घ्या
Pm Kisan Samman Nidhi: ‘या’ लोकांना नाही मिळणार पैसे; तुम्ही पात्र आहात का ??
UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…