नवी दिल्ली । आपल्याकडे अनेक सरकारी योजना आहेत, मात्र अशा योजनांचे छुपे फायदे फारच कमी लोकांना माहिती आहेत. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया हे एका विशिष्ट खात्यावर 2 लाख रुपयांपर्यंतच्या इन्शुरन्सचे फायदे देखील देत आहे.
ज्या ग्राहकांनी प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खाते उघडले आहे त्यांना SBI 2 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स देत आहे. सध्या, 28 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते उघडलेल्या ग्राहकांना या इन्शुरन्सचा लाभ उपलब्ध आहे. तसेच, ज्यांनी RuPay PMJDY कार्डसाठी अर्ज केला आहे त्यांना इन्शुरन्स कव्हर मिळत आहे.
28 ऑगस्ट 2018 पर्यंत ज्या ग्राहकांनी PMJDY खाते उघडले आहे त्यांना RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स आणि त्यानंतर RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा ऍक्सिडेंटल कव्हर दिला जात आहे.
फायदा कसा मिळवायचा ?
पीएम जन धन योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामधील खातेदाराला ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो. याचा लाभ घेण्यासाठी खातेदाराच्या नॉमिनीला मृत व्यक्तीच्या डेथ सर्टिफिकेटसह एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मसोबत ऍक्सिडेंटची FIR कॉपी, पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि मृत व्यक्तीच्या आधार कार्डची कॉपी सादर करावी लागणार आहे.
अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत क्लेम जमा करणे आवश्यक असेल तरच जन धन खात्यातील ऍक्सिडेंटल इन्शुरन्सचा लाभ मिळेल. यावेळी नॉमिनीचे नाव बँकेच्या डिटेल्ससह, पासबुकची कॉपी देखील सादर करावी लागेल.
जन धन खात्याचे फायदे
– डिपॉझिट्सवर व्याज.
– एक लाख रुपयांचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर.
– सहा महिन्यांनी ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल.
– कोणताही मिनिमम बॅलन्स डिपॉझिट ठेवण्याची गरज नाही.
– सामान्य अटींवर लाभार्थीच्या मृत्यूवर 30,000 रुपयांचा लाईफ इन्शुरन्स देय असेल.
– कुटुंबातील महिलेसाठी केवळ एका खात्यात 5,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा.