SBI देत आहे 2 लाख रुपयांचा फायदा, त्याचा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या

PIB fact Check
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. वास्तविक, SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स देत आहे. जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. 2014 साली प्रधानमंत्री जन धन योजना सुरु करण्यात आली. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना फायनान्शिअल सर्व्हिसेस, बँकिंग सेव्हिंग आणि डिपॉझिट अकाउंट, क्रेडिट, इन्शुरन्स, पेन्शनमध्ये परवडणाऱ्या पद्धतीने प्रवेश सुनिश्चित करते.

एसबीआय रुपे जनधन कार्डची सुविधा बँकेकडून जन धन ग्राहकांना दिली जाते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरची सुविधा देत आहे. रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदीही करू शकता.

ट्रान्सफरचा पर्याय देखील आहे
बेसिक सेव्हिंग अकाउंट जन धन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या RuPay PMJDY कार्डांसाठी इन्शुरन्सची रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी केलेल्या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा ऍक्सिडेंटल कव्हर बेनिफिट मिळेल.

क्लेम कसा करायचा ते जाणून घ्या
या योजनेअंतर्गत पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसी भारताबाहेरील घटना देखील समाविष्ट करते. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर इन्शुरन्सच्या रकमेनुसार क्लेम भारतीय रुपयांमध्ये दिला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसाच्या खात्यात नॉमिनी होऊ शकेल.

अशाप्रकारे उघडा खाते
तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल, तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहजपणे करू शकाल. यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. त्यात नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी व्यक्ती, बिझनेस/नोकरी आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या, SSA कोड किंवा प्रभाग क्रमांक, गावाचा कोड किंवा शहर कोड इ. द्यावा लागेल.