SBI Platinum Deposits: टर्म डिपॉझिट्सवर मिळवा 6.20 टक्के व्याज दर, 14 सप्टेंबरपर्यंत आहे संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँकेने 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम (SBI Platinum Deposit Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, SBI रिटेल डिपॉझिटर्सना 0.15 टक्के पर्यंत अतिरिक्त व्याज मिळेल. ही योजना मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. योजना 15 ऑगस्ट रोजी सुरू झाली आणि 14 सप्टेंबर रोजी संपेल.

SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि म्हटले की, “प्लॅटिनम डिपॉझिटसह देशाचे स्वातंत्र्य साजरे करण्याची वेळ आली आहे. SBI च्या सहकार्याने Term Deposits आणि Special Term Deposits चा लाभ घ्या. ही ऑफर फक्त 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असेल.”

SBI ग्राहक या योजनेअंतर्गत 75 दिवस, 75 आठवडे (525 दिवस) आणि 75 महिने (2250 दिवस) अतिरिक्त व्याज मिळवू शकतात. ही ऑफर घरगुती किरकोळ ग्राहकांना तसेच नॉन-रेसिडेंट एक्‍सटर्नल आणि नॉन-रेसिडेंट ऑर्डनरी अकाउंट होल्‍डर्सना 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या रिटेल टर्म डिपॉझिट्ससाठी उपलब्ध असेल.

सामान्य ग्राहकांसाठी प्लॅटिनम डिपॉझिट्स
75 दिवस – 3.95 टक्के (सध्याचे दर – 3.90 टक्के)
525 दिवस – 5.10 टक्के (सध्याचे दर – 5 टक्के)
2250 दिवस – 5.55 टक्के (सध्याचे दर – 5.40 टक्के)

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्लॅटिनम डिपॉझिट्स
75 दिवस – 4.45 टक्के (सध्याचे दर – 4.40 टक्के)
525 दिवस – 5.60 टक्के (सध्याचे दर – 5.50 टक्के)
2250 दिवस – 6.20 टक्के

Leave a Comment