नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यावधी ग्राहकांच्या सोयीसाठी डोअरस्टेप बँकिंग सेवा सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना त्यांची बँकिंगची कामे आता घरबसल्याच सेटल करता येतात. जर ग्राहकांना आपातकालीन कॅश हवी असेल तर बँक घरीही रोख रक्कम पोचविण्यासाठी तयार आहे. या व्यतिरिक्त वृद्ध लोकं त्यांचे जीवन प्रमाणपत्र देखील घरातूनच सादर करू शकतील. या सुविधेचा लाभ एसबीआय ग्राहक केवळ निवडक शाखांद्वारेच घेऊ शकतात. एसबीआयच्या डोअरस्टेप स्टेप बँकिंग सुविधेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे ते जाणून घ्या…
बँकेच्या या सेवेखाली या सुविधा उपलब्ध असतील
> रोख व्यवहार
> चेक पिकअप (विनंतीमध्ये जास्तीत जास्त दोन)
> चेक रिक्लेमेशन स्लिप पिकअप
> फॉर्म 15 एच पिकअप
> ड्राफ्ट्सची डिलिव्हरी (बँक ड्राफ्ट्स घरी पोहोचवेल)
> टर्म डिपॉझिट ऍडव्हाइस/ अकाउंट स्टेटमेंटची डिलिव्हरी
> लाइफ सर्टिफिकेट पिकअप
> केवायसी डॉक्यूमेंट्स पिकअप
> एका दिवसात किमान 1000 – 20000 रुपये जमा आणि काढले जाऊ शकतात.
डोअरस्टेप बँकिंगसाठी अर्ज कसा करावा
> एसबीआयच्या डोअरस्टेप बँकिंग सेवा योनो, वेब पोर्टल आणि कॉल सेंटर या मोबाईल अॅपद्वारे मिळवता येऊ शकतात.
> याशिवाय कामाच्या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत 1800111103 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करता येईल.
> एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांबद्दल अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात.
> याशिवाय ग्राहक आपल्या होम ब्रँचमध्ये संपर्क साधू शकतो.
या लोकांना याचा फायदा होईल
> वय 70 पेक्षा जास्त असेल आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल.
> केवायसी पूर्ण असलेले.
> वैध मोबाइल नंबर खात्याशी लिंक्ड असला पाहिजे.
> सिंगल अकाउंट होल्डर किंवा जॉईंट अकाउंट होल्डर पैकी एक हजर असला पाहिजे.
> संयुक्तपणे ऑपरेटेड अकाउंट, मुलांसाठी उघडलेली खाती
> नॉन पर्सनल नेचर खात्यांसाठी उपलब्ध नसेल.
> खातेधारकाचा पत्ता होम ब्रँचच्या 5 किमीच्या आत नोंदविला जाणे आवश्यक आहे, म्हणजे खातेधारकाचे घर होम ब्रँचपासून 5 किमीच्या अंतरावर असावे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.