शेतकरी आणि माझ्यात फक्त एका कॉलचं अंतर ; पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं आणणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणं टाळलं होतं. मात्र, अखरे अधिवेशनाच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल मौन सोडलं.कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारनं आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना भावनिक साद घातली.

शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकते. संवादाचं द्वार नेहमीच खुलं आहे, असं पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत म्हणाले. ‘कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या विधानाचा मी पुनरुच्चार करू इच्छितो. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नसला तरीही आम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय खुले ठेवले आहेत. त्यांनी यावर चर्चा करावी. शेतकरी आणि माझ्यात केवळ एक कॉलचं अंतर आहे,’ असं मोदींनी म्हटलं.

सरकार शेतकऱ्यांसोबत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यामध्ये सर्व विषयांवर चर्चा होईल. सर्व पक्षांना बोलण्याची संधी मिळेल. कृषीमंत्री तोमर यांनी शेतकऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास नेहमीच तयार आहे, असं मोदी सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment