हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Wecare FD Scheme) एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. जिची ग्राहक संख्या फार मोठी आहे. जर तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरणार आहे. माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. SBI We Care या दमदार योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बँकेने वाढवल्याचे सांगितले आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. त्यामुळे ही बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची आहे.
SBI We Care FD योजना (SBI Wecare FD Scheme)
SBI ने SBI We Care FD योजना ही विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन सुरू केली आहे. या FD योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षे ते १० वर्षे इतक्या कालावधीसाठी गुंतवणुकीवर उत्कृष्ट व्याज दिले जाते. या योजनेवर ७.५% व्याजदर दिले जाते. SBI च्या माध्यामातून दिली जाणारी ही ऑफर ज्येष्ठ नागरिकांना ०.५% अतिरिक्त व्याज देते. आतापर्यंत एसबीआयच्या या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ होती. मात्र आता मुदत वाढवण्यात आल्याचे समजत आहे.
We Care FD योजनेच्या गुंतवणूक कालावधीत मुदत वाढ
SBI च्या We Care FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ३१ मार्च २०२४ ही शेवटची तारीख होती. (SBI Wecare FD Scheme) मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी वाढवण्यात आला असून आता गुंतवणूकदार पुढील ६ महिन्यांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतील. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ ही बदलून आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत किमान ५ वर्षे ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येईल.