हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडण्याची सुविधा देखील देते. बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, केवायसी डॉक्युमेंट्स असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे खाते उघडता येते. मुळात बँकेकडून ही सुविधा समाजातील गरीब वर्गाला पुरवली जाते ज्यांना बँकेचे शुल्क भरता येत नाहीत. झिरो बॅलन्स खाते म्हणजे या खात्यामध्ये ग्राहकाला पैसे ठेवण्यावर कोणतेही बंधन नाही. मात्र यामध्ये खातेदाराला चेकबुक दिले जात नाही.
हे लक्षात घ्या कि, या खातेधारकाला आपल्या (SBI) खात्यातून एका महिन्यात 4 वेळा पूर्णपणे मोफत पैसे काढता येतील. तसेच यामध्ये खातेधारकाला आधारच्या माध्यमातूनही पैसे काढता येतील.
या सोबत (SBI) खातेधारकाला रुपे एटीएम-कम-डेबिट कार्डही दिले जाते जे मोफत असेल. तसेच यासाठी कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क देखील आकारले जात नाही.
यामध्ये (SBI) खातेधारकाला NEFT/ RTGS सारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमद्वारे रक्कम घेतली आणि पाठविली जाऊ शकते. ही सर्व्हिसही मोफत असेल.
मात्र जर हे खाते दोन वर्षे वापरले गेले नाही तर ते डोअरमॅट अकाउंट बनते. यानंतर डॉक्युमेंट्स सबमिट करून ते पुन्हा ऍक्टिव्हेट केले जाऊ शकते. तसेच यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/accounts/saving-account/savings-bank-account
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
Amazon वरील Oppo Fantastic Sale मधून स्वस्तात घरी आणा Oppo चे ‘हे’ स्मार्टफोन
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Multibagger Stock : गेल्या 3 वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 2,244% रिटर्न
Recharge Plan : 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे