हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभर विरोधाची लाट पसरली असताना या कायद्याला तूर्तास स्थगिती देता येणार नाही असं सांगत शरद बोबडे यांच्या खंडपीठाने आंदोलकांची याचिका फेटाळली आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातून १४० हुन अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर घेण्यात येणार आहे.
CAA कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थही विविध संघटनांनी मोर्चे काढल्याचं मागील महिनाभरात पाहायला मिळालं. दिल्लीतील शाहीनबाग परिसरात जवळपास ५ आठवडे महिलांचं आंदोलन सुरुच आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाच्या निकालानंतर देशभरात काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”
असा असायचा स्वातंत्र्यपूर्व भारताचा अर्थसंकल्प!
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य होणार; मंत्री सुभाष देसाईंची माहिती