Saturday, March 25, 2023

‘या’ कारणासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली नोटीस

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सद्यस्थितीत देश करोनासारख्या महामारीचा सामना करतो आहे. अशात करोनाचे संकट गहिरे होताना हातावरचं पोट असलेल्या कामगारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळं लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मजूर, कामगारांना तातडीने वेतन द्या असं सांगणारी एक नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर आणि अंजली भारद्वाज या दोघांनी लॉकडाउनच्या कालावधीत कामागारांना त्यांचे किमान वेतन केंद्राने द्यावे यासंदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

या याचिकेवरच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावत या कामगारांचे किमान वेतन तातडीने द्यावे असं म्हटलं आहे. देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व कामधंदे बंद आहेत. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर निर्वासित कामगार, मजुरांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं या कामगारांना किमान वेतन द्यावे असा आदेशवजा नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्राला बजावली आहे.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता