औरंगाबाद – कोरोना महामारी मुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे येत्या 4 ऑक्टोबर पासून औरंगाबाद शहरातील इयत्ता आठवी पासून तर ग्रामीण भागातील पहिली पासून शाळा सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे घरी बसून कंटाळलेल्या बच्चे कंपनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना संमती पत्र द्यावे लागणार आहे.
कोरोना चा संसर्ग आटोक्यात आल्याने शासनाने ग्रामीण सोबतच शहरातील खाजगी आणि मनपाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील कोवीड मुक्ता गावात आठवी ते बारावी पर्यंत चे वर्ग सुरू करण्यात आले, तर पाचवी ते सातवी पर्यंतच्या शाळांना 6 सप्टेंबर पासून परवानगी देण्यात आली. शहरातील शाळा मात्र सध्या पूर्णपणे बंद आहेत. आता शासनाच्या निर्णयानुसार 4 ऑक्टोबर पासून औरंगाबाद शहरातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची घंटा वाजणार आहे.
ग्रामीण भागात मात्र पहिली पासून शाळा सुरू केली जाणार आहे. याकरिता पालकांची संमती पत्र घेऊनच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळेल. ज्या गावात कोरोनाचा रुग्ण आहे, या गावात मात्र शाळा भरणार नाही. शहरातील ज्या वार्डात कोरोनाचा रुग्ण आहे, या वॉर्डातील ही शाळा बंद राहतील. तसेच, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ओल्ड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातील 850 शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत 2 लाख 77 हजार 533 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
जिल्ह्यातील शाळांची संख्या –
जिल्हा परिषद शाळा – 2131
शासकीय शाळा – 31
खासगी अनुदानित शाळा – 978
खासगी विनाअनुदानित शाळा – 1462
एकूण शाळा – 4602