काय सांगता? शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; वैज्ञानिकाने केली इलेक्ट्रॉनिक मातीची निर्मिती

Electronic soul
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वाढत्या आधुनिकीकरणामुळे शेतीमध्ये देखील आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्याला शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करणे सुलभ झाले आहेत. मात्र या सगळ्यात स्वीडनने एक पाऊल पुढे टाकत चक्क इलेक्ट्रॉनिक माती तयार केली आहे. स्वीडनच्या एका वैज्ञानिकाने हा प्रयोग करून दाखवला आहे. खरे तर ही माती म्हणजे एक मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशन आहे. यामध्ये पिकाची वाढ तब्बल 50 टक्के अधिक होत असल्याचा दावा या वैज्ञानिकाने केला आहे.

स्वीडनमधील लिंकपिंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन करून दाखवले आहे. विज्ञान विश्वात मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशनमध्ये (Mineral Nutrient Solution) शेती करण्याच्या प्रक्रियेला हायड्रोपोनिक्स असे म्हटले जाते. प्रत्यक्षात यामध्ये मातीचा वापरच केला जात नाही. तर सोल्युशनमध्ये थेट पिकांची वाढ केली जाते. हे अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी विजेचा वापर केला जातो. यामुळेच त्याला इलेक्ट्रॉनिक सॉईल असे म्हटले जाते.

बऱ्याच काळापूर्वी या प्रक्रियेचा शोध ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करून लावण्यात आला होता. सध्या अनेक ठिकाणी या प्रक्रियेचा वापर करून शेती करण्यात येत आहे. या प्रक्रिया मार्फत पिकांना पोषक तत्वे ही थेट मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशनमधून दिली जातात. ज्यात सर्व पिकांना एका विशिष्ट सबस्ट्रेटवर लावले जाते. पुढे सबस्ट्रेटमध्ये वीज प्रवाहित करून त्याला अ‍ॅक्टिव्हेट करण्यात येते. यामुळेच रोपे झोपलेली असताना देखील वेगाने मुळे पोषक द्रव्य शोषतात. ज्याने पिकांची वाढ देखील वेगाने होते.

दरम्यान, सध्या प्रदूषणामुळे पिकांची वाढ योग्यरीत्या होत असल्याची अनेक कार्यासमोर आले आहेत. अशातच पीक उत्पादनासाठी अशी नवनवीन प्रक्रिया समोर येत असल्यामुळे भविष्यात त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होईल हे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे, या प्रक्रियेच्या माध्यमातून शेती करताना शेतकऱ्याला जास्त जागा देखील लागत नाही. तसेच माती असण्याची देखील गरज भासत नाही.