राष्ट्रपतीचा दाैरा : रायगडावर हेलिकाॅप्टर उतरविण्यास शिवभक्तांचा विरोध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

किल्ले रायगड येथे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा असून भारताचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचा शिवभक्तांना आदर आहे. किल्ले रायगड येथे हेलिकॉप्टर उतरवल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर धूळ उडत असल्यानं मूर्तीची विटंबना केल्यासारखा प्रकार घडला जाणार आहे. तेव्हा हेलिकाॅप्टर रायगडावर उतरविण्यास विरोध असल्याचे धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी सांगितले.

किल्ले रायगड येथे 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी लष्करी हेलिकॉप्टरने राष्ट्रपती रामनाथ कोंविद याचे आगमन होणार आहे. राष्ट्रपतींचा 6 डिसेंबर रोजी पाहणी दाैरा होत आहे. मात्र किल्ले रायगड येथे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात येत आहे. त्यास साताऱ्यातील शिवभक्तांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत धर्मवीर युवा मंचने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतचे निवेदन दिले आहे.

राष्ट्रपतीचे रायगडावर स्वागत आमच्याकडून असेल, मात्र त्यांनी गडावर हेलिकाॅप्टर उतरू नये. अन्यथा शिवभक्तांचा उद्रेक होईल. प्रशासकीय यंत्रणेने यांचा विचार करून पर्यायी व्यवस्था करावी. केंद्र सरकारने ठेकेदारी पोसण्याचे काम बंद करावे अन्यथा गनिमी कावा करून आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

You might also like