हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

scorpio and a dumper caught fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे वातावरण थंड झालं असलं तरी राजकीय वादामुळे वातावरण गरम झालं आहे. हिंगोली शहरात किरकोळ वादातून रात्रीच्या वेळी एक स्कॉर्पिओ गाडी आणि डंपर पेटवण्यात (scorpio and a dumper caught fire) आला. या आगीत स्कॉर्पिओ आणि डंपर जळून खाक (scorpio and a dumper caught fire) झाले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
हिंगोली शहरात किरकोळ वादातून रात्रीच्या वेळी एक स्कॉर्पिओ गाडी आणि डंपर पेटवून देण्यात आला. हिंगोली शहरातील रहिवाशी पंकज होडगीर व भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातूनच रात्रीच्या वेळी पंकज होडगीर यांची घरासमोरील स्कॉर्पिओ गाडी व एमआयडीसी भागात डंपर ही दोन वाहने पेटवून देण्यात (scorpio and a dumper caught fire) आली असल्याची तक्रार पंकज होडगीर यांनी दाखल केली.

या प्रकरणी हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या जाळपोळीचा (scorpio and a dumper caught fire) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा समोर आले आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?