Scream Therapy : मानसिक शांततेसाठी पकडा किंचाळण्याचा सूर, ताणतणाव राहील चार हात दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Scream Therapy) आपल्या आसपासची एखादी व्यक्ती सतत जोरजोरात ओरडत असेल, मोठ्याने बोलत असेल किंवा अक्षरशः किंचाळत असेल तर साहजिक आहे एक तर आपल्याला राग येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाचा वैताग येतो. पण तुम्हाला माहित आहे का? तणाव मुक्त राहण्यासाठी ओरडणे किंवा किंचाळणे अत्यंत फायदेशीर आहे, असं काही तज्ञांनी केलेल्या संशोधनात समोर आलं आहे. या संशोधनानुसार मानसिक आरोग्यासाठी जोरजोरात किंचाळणे, ओरडणे कसे लाभदायी आहे? याबाबत काही महत्वाचे मुद्दे सादर करण्यात आले आहेत. चला तर याविषयी तज्ञ काय सांगतात? हे जाणून घेऊया.

काय सांगतो तज्ञांचा रिपोर्ट?

जोर जोरात ओरडणे किंवा किंचाळणे याबाबत बोलताना तज्ञ मंडळी सांगतात की, हा कॅथॉरिसिसचा एक प्रकार असल्याप्रमाणे काम करतो. (Scream Therapy) आता कॅथॉरिसिस म्हणजे काय? तर भावना व्यक्त करण्याची पद्धत. जर तुम्ही तुमच्या भावना ओरडून किंवा किंचाळून व्यक्त केलात तर यामुळे तुमचा मानसिक तणाव दूर होण्याची सर्वाधिक शक्यता असते. इतकेच नव्हे तर, यामुळे मनाला आणि मेंदूला बऱ्यापैकी आराम मिळतो. शिवाय आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.

‘स्क्रिम रूम’चा वापर (Scream Therapy)

नुसतं ओरडलं किंवा जोरजोरात किंचाळलं तरीही मनाला कुठे न कुठे आराम मिळतो. अशा वेळी योग्य फायद्यासाठी ओरडायची विशिष्ट पद्धत वापरावी, असे तज्ञ सांगतात. प्रत्येकाची ओरडायची पद्धत वेगळी असू शकते. व्यक्तीच्या ओरडण्यावरून तिला कोणत्या आणि कशा उपचारांची गरज आहे? हे सांगता येते. यातील बऱ्याच प्रकरणांमध्ये डॉक्टर रुग्णाला बालपणीच्या चांगल्या – वाईट प्रसंगांची उजळणी करून देतात. असे प्रसंग वारंवार आठवण सांगतात आणि ते आठवून व्यक्त होण्यास प्रवृत्त करत. यानंतर रुग्ण आपल्या आठवणींच्या कोशात रमतो आणि ओरडून आपल्या भावना व्यक्त करू लागतो. या थेरेपीसाठी एक खोली वापरली जाते. जिला ‘स्क्रिम रूम’ असे म्हणतात.

(Scream Therapy) या थेरेपीमुळे संबंधित रुग्ण मानसिक आणि शारीरिकरित्या बऱ्याच प्रमाणात रिलॅक्स होतो. पण, जर तुम्ही चुकीच्या जागी उगाच आरडा ओरडा करू लागलात, किंचाळू लागलात किंवा रागवून आक्रमक होऊन केवळ आपला मुद्दा ठोकण्यासाठी असे व्यक्त होत असाल, तर तुमच्यामुळे या उपचार पद्धतीचे महत्व कमी होत आहे, हे लक्षात घ्या.

ओरडण्याचे परिणाम

प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट अर्थात सकारात्मक आणि नाकारात्मक परिणाम होत असतात. जर ओरडल्यामुळे तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक स्वरूपातील शांतता मिळत असेल तर निश्चितपणे तुमच्यावर सकारात्मक परिणाम होत आहे असे म्हणता येईल. (Scream Therapy)

सकारात्मक परिणाम – अशी थेरेपी घेताना ओरडल्यामुळे तुमचा मानसिक ताण तणाव कमी होतो. वेदना कमी होतात. इतकेच नव्हे तर शरीरात नव्हे चैतन्य आणि ऊर्जा जागृत होते.

नकारात्मक परिणाम – या थेरेपीदरम्यान ओरडण्यामुळे कधी कधी तुमच्या अंतर इंद्रियांवर ताण येऊ शकतो. स्वर ताणल्याने तुमच्या घशाला त्रास होऊ शकतो. शिवाय रक्तदाब वाढू शकतो. इतकेच नव्हे तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला ‘व्होकल कॉर्ड नोड्युल’ हा आजार होण्याची शक्यता असते.

लक्षात ठेवा

एखादी व्यक्ती खरोखरच एखाद्या मानसिक आजाराची झुंज देत असते. (Scream Therapy) त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडवून गेलेल्या एखाद्या घटनेचा प्रभाव वारंवार त्रास देत असतो. अशावेळी ही उपचार पद्धतीने निश्चितपणे कामी येते. मात्र, मानसिक शांततेसाठी जर तुम्ही एखाद्या खुल्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी आरडा, ओरडा करत असाल तर यामुळे तुम्हाला ही मानसिक शांतता लाभणार नाही आणि इतरांनाही त्याचा त्रास होईल. त्यामुळे योग्य फायद्यांसाठी योग्य उपचार पद्धतीचा अवलंब करा.