Seaplane Service In Maharashtra : पर्यटकांसाठी खुषखबर!! महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात सुरू होणार सी- प्लेनची सुविधा

Seaplane Service In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Seaplane Service In Maharashtra। देशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी सरकार नेहमीच नवनवीन उपाय आणि योजना आणत असते. मग ते केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, देशातील पर्यटन वाढावे, पर्यटकांना नवनवीन अनुभव घेता यावेत नेहमीच नवीन काहीतरी केलं जाते. आताही सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. देशातील पर्यटनाला चालना मिळावी. तसंच, दुर्गम भागातील पर्यटन (Tourism) अधिक वाढावे यासाठी आता सी-प्लेन आणि हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे सरकारने नियोजन आहे. केंद्र सरकारच्या उडाण 5.5 योजनेअंतर्गंत हि सेवा सुरु करण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील ८ पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

देशातील १५० जलस्थळांबरोबर राज्यातील आठ ठिकाणी ‘एअरो ड्रोम’ (जलाशयातील धावपट्टी) उभारण्याचे नियोजन सरकारचे आहे. विमान वाहतूक मंत्रालयाकडून सी-प्लेन ही सुविधा (Seaplane Service In Maharashtra) सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार, महाराष्ट्र आणि लक्षद्वीप या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणच्या नद्या, जलाशयातून हवाई वाहतूक केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी कॅनडामधील ‘डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड’ या कंपनीची विमाने वापरण्यात येणार आहेत. देशात इंडिगो आणि पवनहंस या कंपन्या सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. तर सरकारने सुद्धा कमी व्यवहार्यता अनुदान निधी (गॅप फंडिंग) देण्यास समर्थता दर्शवली. या जलवाहतुकीचे शुल्क साधारण दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असल्याने सामान्य माणसांनाही परवडण्यासारखं आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या सेवेचा देशभरात विस्तार केला जाणार आहे. सी-प्लेन आणि हेलिकॉप्टर सेवेमुळे केंद्र सरकारच्या उडाण योजनेलाही प्रोत्साहन मिळेल.

महाराष्ट्र्रात कोणकोणत्या ठिकाणी सी-प्लेन सुविधा? Seaplane Service In Maharashtra

धोम धरण वाई सातारा,
गंगापूर धरण नाशिक,
खिंडसी धरण नागपूर ,
कोराडी धरण मेहकर बुलढाणा,
पवना धरण पवनानगर पुणे ,
पेच धरण पारा शिवनी नागपूर ,
गणपतीपुळे रत्नागिरी
रत्नागिरी