सेबीने PNB हाउसिंग फायनान्स-Carlyle ग्रुपचा 4 हजार कोटी रुपयांचा करार रोखला, त्यामागील कारण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मार्केट रेग्युलेटर सेबीने पंजाब नॅशनल बँक हाउसिंग फायनान्सला (PNBHF) Carlyle Group सह 4 हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित करार थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. मार्केट रेग्युलेटर सेबीने म्हटले आहे की, 31 मे रोजी Extraordinary General Meeting बोलावण्याबाबत बजावलेली नोटीस कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या (Article of Association -AOA) नियमांच्या विरोधात आहे. जोपर्यंत कंपनी शेअर्सचे व्हॅल्यूएशन करत नाही, तोपर्यंत त्यावर कारवाई करता येणार नाही.

कंपनीची EGM 22 जूनसाठी निश्चित केली गेली आहे. ज्यामध्ये कार्लाईल ग्रुपच्या नेतृत्वात स्थापित केलेल्या एका कंसोर्टियम (consortium) ला ​​शेअर्स देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कार्लाइल ग्रुप कंपनीचा स्टेक होल्डर होईल.

अर्थ मंत्रालयही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे
यावर PNBHF ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आणि त्याच्या संचालक मंडळाने सेबीच्या पत्राची दखल घेतली आहे. त्यांना खात्री आहे की, कंपनीने सेबी आणि कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये नमूद केलेल्या सर्व नियमांचे पालन केले आहे. या नियमांमध्ये सेबीने ठरविलेल्या किंमतींच्या नियमांचादेखील समावेश आहे. अशी Preferential Allotment कंपनी त्यांचे स्टेक होल्डर्स आणि सर्व संबंधित स्टेक होल्डर्सच्या हिताचे आहे असेही कंपनीचे मत आहे. या निवेदनात पुढे असेही म्हटले गेले आहे की, कंपनी या प्रकरणात पुढील पाऊले उचलण्याबाबत विचार करत आहे. या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अर्थ मंत्रालय देखील या करारावर लक्ष ठेवून आहे.

करारावर प्रश्न उपस्थित केले
वास्तविक, काही दिवसांपूर्वी एका proxy advisory firm ने या करारावर प्रश्न उपस्थित केले होते. या proxy advisory firm Stakeholders Empowerment Services -SES ने या करारावर टीका केली आणि म्हटले की,” हा करार PNB हाउसिंग फायनान्स आणि पंजाब नॅशनल बँक या दोन्ही स्टेक होल्डर्सच्या हिताच्या विरोधात आहे. यामागचे कारण असे आहे की, हा करार अत्यंत कमी मूल्यांकनावर केला गेला आहे. या कराराचे व्हॅल्यूएशन कंपनीच्या बुक व्हॅल्यू (book value of the company) कमी स्तरावर केली गेली आहे, असेही फर्म सांगते. SES चा विश्वास आहे की, हा करार कंपनीच्या AOA नुसार केला गेलेला नाही. हा करार Ultra Vires अंतर्गत करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment