शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी SEBI ने लॉन्च केले सारथी अ‍ॅप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. बोर्डाचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी बुधवारी गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यासाठी सारथी हे मोबाईल अ‍ॅप लॉन्च केले.

या अ‍ॅपद्वारे, गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केट, केवायसी प्रक्रिया, ट्रेडिंग आणि सेटलमेंट, म्युच्युअल फंड, बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा यासारख्या गोष्टींची माहिती उपलब्ध होईल.

‘अ‍ॅप तरुणांमध्ये लोकप्रिय होईल’
हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. तुम्ही ते तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर वापरू शकता. म्हणजे तुम्ही ते Play Store आणि App Store या दोन्हीवरून डाउनलोड करू शकता.

अ‍ॅप लाँच करताना त्यागी म्हणाले, “हे मोबाइल अ‍ॅप गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटबद्दल ज्ञान देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने SEBI चा एक उपक्रम आहे. अलीकडेच अनेक गुंतवणूकदारांनी बाजारात प्रवेश केल्यामुळे, बहुतांश व्यापार हा मोबाईल फोनवर आधारित आहे, हे अ‍ॅप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जनतेपर्यंत सहज उपलब्ध करून देण्यात मदत करेल. मला खात्री आहे की येत्या काळात हे अ‍ॅप गुंतवणूकदारांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होईल.”

मुंबईत आयोजित अ‍ॅपच्या लॉन्च इव्हेंटमध्ये, त्यागी यांनी अ‍ॅप कन्टेन्ट सतत अपडेट करण्याच्या आणि प्रादेशिक भाषांमध्ये अ‍ॅप उपलब्ध करून देण्याची आवश्यकता यावर भर दिला. सेबीचे पूर्णवेळ सदस्य एसके मोहंती, कार्यकारी संचालक आणि नियामक संस्थेचे इतर अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.