हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंबंधात लोकांच्या मनात अनेक प्रश्न तयार होत असतात. यामधील मुख्य प्रश्न असा की, गुंतवणुकीसाठी बाजारातील अशी कोणती क्षेत्रे आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळू शकेल. आजच्या या बातमीमध्ये आपण अशाच काही क्षेत्रांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून येत्या काही वर्षांत मोठा फायदा मिळवता येऊ शकेल.
कोणत्याही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि त्यासाठी लागणारा वेळ ठरवावा. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि त्यासाठी किती काळ गुंतवणूक करायची आहे याबाबत स्पष्ट रहायला हवे. जर आपण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणार असाल तर यासाठी ऑटोमोबाईल, इंफ्रास्ट्रक्चर आणि डीफेशन ही क्षेत्रे चांगली ठरतील. कारण या क्षेत्रांतील गुंतवणूक दीर्घकाळासाठी खूपचा फायदेशीर ठरेल. Stock Market
हे जाणून घ्या कि, भारत सरकार कडून येत्या काळात पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे खूपच फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत जर आपल्याला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील कंपन्या चांगला पर्याय ठरू शकतील. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांबाबतही सरकारचा दृष्टिकोन चांगला आहे. तसेच आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी देखील सरकारकडून काम केले जात आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणेही फायद्याचे ठरेल. Stock Market
डिफेन्स क्षेत्र हे नेहमीच चांगला रिटर्न देते. यासोबतच मेक इन इंडिया अंतर्गत देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या उपकरणांवरील अवलंबित्वही कमी होत आहे. ज्यामुळे येत्या काळात देशात संरक्षण उपकरणांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकेल. Stock Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
बंद झालेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्या संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Bank Account : आपले बंद झालेले खाते पुन्हा सुरु करण्यासाठीचे नियम तपासा
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण
FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ