संतापजनक!! पुण्यात पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपी जेरबंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. विमाननगर भागात एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने चिमुरडीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिलीपकुमार गोस्वामी (२०) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतो, तर पीडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत एका लेबर कॅम्पमध्ये राहते. तिचे आई-वडील दोघेही कामाला जातात. आई-वडील कामाला गेल्यानंतर पीडित चिमुरडी घरी एकटीच असते, हे आरोपीने हेरले. दुपारी आरोपीने पाच वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरातून बाहेर बोलावले आणि तो काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरूमच्या पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.

या घटनेनंतर पीडित चिमुरडी घरी गेली. त्यावेळी मुलीची आई कामावरून घरी आली होती. मुलगी खूप घाबरलेली दिसल्याने चौकशी केल्यावर तिने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like