देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला तिसऱ्यांदा समन्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या दोघां बहिणींना तिसऱ्यांदा समन्स जारी केले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कंगनाला २३ तर रंगोली हिला २४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर कंगना राणावत हिनं केलेल्या एका आक्षेपार्ह ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला २६ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

मात्र, दोघींनीही चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर, १० नोव्हेंबर रोजी कंगनाला आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. मुंबई पोलिसांकडून कंगनाला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत. कंगनाकडून अद्याप या समन्सला उत्तर देण्यात आले नाहीये. त्यामुळं कंगना यावेळी तरी चौकशीसाठी हजर राहणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment