सातारा | जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच खबरदारीच्या उपायोजना म्हणून एनडीआरएफचे एक पथक आवश्यक त्या साहित्यासह कराड येथे दाखल झाले आहे.
या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तहसील कार्यालयांमधील दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती पुढीलप्रमाणे. जिल्हा नियंत्रण कक्ष- 1077, तहसिल कार्यालय, सातारा- 02162 – 230681, भ्रमणध्वनी-9158303900, तहसील कार्यालय- कोरेगाव- 02163 – 220240, भ्रमणध्वनी-9545468281, तहसील कार्यालय- जावली- 02378 – 285223, भ्रमणध्वनी- 9403683444, तहसील कार्यालय- वाई- 02167 – 227711, भ्रमणध्वनी- 9850030074, तहसील कार्यालय- महाबेश्वर-02168 – 260229, भ्रमणध्वनी- 9420125556, तहसील कार्यालय- खंडाळा- 02169 – 252128, भ्रमणध्वनी – 7030833939, तहसील कार्यालय- फलटण-02166- 222210, भ्रमणध्वनी-7588627304, तहसील कार्यालय- माण- 02165 – 220232, भ्रमणध्वनी -9422948008, तहसील कार्यालय- खटाव – 02161 – 231238, भ्रमणध्वनी- 9850762034, तहसील कार्यालय- कराड- 02164 – 222212, भ्रमणध्वनी-7972490968, तहसील कार्यालय- पाटण-02372 – 283022, भ्रमणध्वनी- 7083999900.
तरी प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णतः सज्ज असून जिल्ह्यातील नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी- • कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका
• नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा
• दरड प्रवण भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगून आवश्यकता भासल्यास सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित व्हा.
• मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
• जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
• नदी, नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
• अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
• धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका.