Thursday, February 2, 2023

Cryptocurrency ची वाढती लोकप्रियता पाहून आता Google ने मोठी घोषणा केली आहे ! आता वॉलेट जाहिरातही स्वीकारणार, अशाप्रकारे होणार फायदा

- Advertisement -

नवी दिल्ली । सध्या क्रिप्टोकरन्सीबाबत भारतासह जगभरात प्रचंड उत्साह आहे. आता बहुतेक लोकांना क्रिप्टोकरन्सीजबद्दल जाणून घ्यायचे आहे, त्यामध्ये गुंतवणूक करण्यात त्यांना रस वाटतो आहे. कारण आहे – यातून अल्प कालावधीत मिळणारा नफा. दिग्गज टेक कंपनी गुगलने क्रिप्टोकरन्सीजची वाढती लोकप्रियता पाहता आपल्या जाहिरात धोरणामध्ये बदल करण्याचे जाहीर केले आहे. गूगल आता 3 ऑगस्ट 2021 पासून त्याच्या प्लॅटफॉर्मवर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि डिजिटल वॉलेटच्या युझर्सकडून जाहिराती स्वीकारण्यास सुरुवात करेल. तथापि, त्याचा फायदा फक्त अमेरिकन लोकांनाच मिळेल.

जागतिक स्तरावर लागू होणार
सर्च इंजिन कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की,” हे नवीन नियम जरी ते जागतिक स्तरावरील जाहिरातींवर लागू केले असले तरी ते फक्त US मधील वॉलेट्सवर लागू आहेत. ऑगस्टमध्ये आपली फायनान्शिअल प्रोडक्ट आणि सर्व्हिस पॉलिसी अपडेट करणार असल्याचे टेक दिग्गज ने म्हटले आहे. Google च्या या नवीन पॉलिसीचा फायदा घेण्यासाठी क्रिप्टो वॉलेट्सची नोंदणी FinCEN आणि फेडरल किंवा स्टेट-चार्टर्ड बँकांमध्ये करणे आवश्यक आहे. तथापि, Google Ads वर इनिशियल कॉइन ऑफरिंग (ICO) जाहिरातींवरील बंदी कायम राहील. याव्यतिरिक्त, DeFi ट्रेडिंग प्रोटोकॉल किंवा जाहिराती अन्यथा क्रिप्टोकरन्सी किंवा संबंधित उत्पादनांच्या खरेदी, विक्री किंवा व्यापारास प्रोत्साहित करते.

- Advertisement -

आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनसह सर्व व्हर्चुअल करन्सीच्या किंमती वाढल्या आहेत. क्रिप्टो मार्केटमध्ये आज, जगातील सर्व टॉप 10 डिजिटल करन्सी ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करीत आहेत. आज किंमतींच्या सर्वात मोठ्या उडीच्या पार्श्वभूमीवर Binance Coin, Polkadot आणि Dogecoin हे टॉप गेनर ठरले आहेत. Binance Coinच्या किंमतीत आज 10.10% ची उडी दिसून आली आणि दुपारी 2.30 वाजता ते 418.05 डॉलर वर ट्रेड करीत होते. त्याच वेळी, Dogecoin आज 8.73% च्या वाढीसह 0.426349 डॉलरवर ट्रेड करीत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group