पूरग्रस्तांची परिस्थिती पाहून जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकरांना रडू कोसळले

0
29
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जावली तालुक्यातील वाहिटे येथे जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे वाटप प्रसंगी बंडातात्या कराडकर भावूक झालेले होते, तेव्हा त्यांना रडू कोसळले. मुसळधार पावसाने लोकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची पाहणी करत जिद्दीने उभे राहण्यासाठी बंडातात्या कराडकर यांनी धीर दिला.

साताऱ्यातील जावली तालुक्यातील दऱ्या-खोऱ्यात राहणारा शेतकरी अतिवृष्टीच्या प्रकोपामुळे पुरता उध्दवस्त झाला आहे. त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांनी जावली तालुक्यातील वाहिटे येथे झालेल्या नुकसानीची कार्यकर्त्यांसमावेत पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत सुपूर्द केली. बंडातात्या कराडकर शेतकर्‍यांना धीर देत असताना, भयानक परस्थिती पाहून ते भावूक झाले.

बंडातात्या कराडकर म्हणाले, तुमच्यावर कोसळलेले हे दुःख इतके मोठे आहे की तुमचे अश्रु कोणीच पुसण्याचा प्रयत्न करताना आम्हांला आनंद होत असतो. पण तुम्हांला जिद्दिने सावरायलाच हवे आणि पुन्हा उभे रहायलाच हवे. आम्ही तुमच्या दुःखाची वाटणी करू शकत नाही. व्यसनमुक्त संघटना एवढ्या मदतीने थांबणार नाही, यापुढे येऊ तुमच्या खाद्यांला खादा लावून काम करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here