आत्मनिर्भर भारत: दिल्ली IIT ने सर्वात स्वस्त कोरोना टेस्ट किटची केली निर्मिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगभरात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. अशा वेळी कोरोना टेस्टचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. कोरोना चाचणीचे हे महागडे दर लक्षात घेऊनच दिल्ली आयआयटीने आज स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती केली आहे. ‘कोरोश्योर’ असे या किटचे नाव आहे. ही स्वस्त कोरोना टेस्ट किट केंद्र सरकारकडून आज लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे या दोघांनी मिळून आज सगळयात स्वस्तातील कोरोना टेस्ट किट लाँच केलं.

भारतातील न्यूटेक मेडिकल कंपनी हे स्वस्तातील कोरोना टेस्ट किट बाजारात उपलब्ध करणार आहे. ‘कोरोश्योर’ मुळे देशात कोरोना चाचण्यांच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होईल. चाचण्यांची संख्या आणि किंमत यामध्ये फरक दिसेल. न्यूटेक मेडिकल कंपनी आयआयटी दिल्लीची टेक्नोलॉजी वापरणार आहे. ”परवडणाऱ्या दरात महिन्याला २० लाख चाचण्या करणे शक्य आहे” असे आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव म्हणाले. या किटला आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.