हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोकं एखाद्यासोबत चित्रपट शेअर करण्यासाठी Telegram App चा वापर करतात. हे लक्षात घ्या कि, Telegram हे एक App आहे ज्यामध्ये चॅटिंग तसेच डेटा शेअरिंग, Telegram चॅनेल तयार करणे, एकमेकांसोबत चित्रपट शेअर करता येतात. मात्र काही लोकं अशीही आहेत ज्यांना Telegram वापरायला आवडत नाही. आता जर कोणाला Telegram शिवाय एखाद्याला चित्रपट पाठवायचा असेल तर यासाठी WhatsApp देखील वापरता येतील. होय, आता व्हॉट्सऍप द्वारे असे करणे शक्य आहे.
सुरक्षेच्या बाबतीत टेलिग्रामपेक्षा व्हॉट्सऍप अधिक सुरक्षित आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून कोणालाही चित्रपट, ऑडिओ व्हिडिओ आणि फोटोज सहजपणे पाठवता येतील.
WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवा 2 GB पर्यंतचे चित्रपट
यासाठी सर्वांत आधी गुगल प्ले स्टोअरवरून WhatsApp चे बीटा व्हर्जन डाउनलोड करा. बीटा आवृत्तीमध्ये अशी अनेक फिचर उपलब्ध आहेत जे त्याच्या सामान्य आवृत्तीमध्ये नाहीत. बीटा व्हर्जनमध्ये एकाच वेळी कोणालाही 2GB पर्यंतचे चित्रपट पाठवता येतात.
अशा प्रकारे 2GB पर्यंत चित्रपट पाठवा
1. बीटा व्हर्जनवरून चित्रपट पाठवण्यासाठी WhatsApp वर जा.
2. खाली दिलेल्या अटॅचमेंटवर क्लिक करा.
3. येथे व्हॉट्सऍप कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन आणि फोटो हे 6 पर्याय दिसतील..
4. या पर्यायांमधून Document (WhatsApp) वर क्लिक करा.
5. यानंतर फाइल मॅनेजर मधून पाठवायचा असलेला चित्रपट निवडा.
6. काही काळानंतर तो चित्रपट MKV फॉरमॅटमध्ये पाठवला जाईल.
WhatsApp बीटा व्हर्जनचे इतर फीचर्स
बीटा व्हर्जनमध्ये असे अनेक फीचर्स पाहायला मिळतात जे सामान्य WhatsApp पेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. इथे फक्त एकदाच पाहण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ कोणालाही पाठवता येतात. मात्र, हे फीचर सामान्य आवृत्तीमध्ये देखील उपलब्ध आहे. तसेच त्या फोटोचा स्क्रिनशॉट कोणी घेतला तर त्याची देखील माहिती मिळेल. आता आपल्याला ऑनलाइनही हाइड करता येईल शकता. यासाठी व्हॉट्सऍप सेटिंगमध्ये जा. त्यानंतर Privacy वर जा आणि Last See वर क्लिक करा. येथे लास्ट सीन नो बॉडी वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/
हे पण वाचा :
Telegram ने भारतीय युझर्ससाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत केली कमी
SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद