हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत UPI च्या माध्यमातून 26.19 लाख कोटी रुपयांचे 14.55 अब्ज पेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन झाले. व्हॉल्यूमच्या दृष्टीने पाहिले तर हा आकडा 2021 च्या याच कालावधीतील सुमारे 99 टक्के आणि मूल्याच्या बाबतीत 90 टक्क्यांहून जास्त आहे. हे लक्षात घ्या कि, पेमेंट इंडस्ट्री मधील आघाडीची कंपनी असलेल्या वर्ल्डलाइनच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
या रिपोर्टनुसार, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पेमेंटच्या विविध चॅनेल्सद्वारे 10.25 लाख कोटी रुपयांचे एकूण 9.36 अब्ज ट्रान्सझॅक्शन करण्यात आले. यामध्ये, यूपीआय P2M (पर्सन टू मर्चंट) ट्रान्सझॅक्शन हे ग्राहकांमध्ये सर्वाधिक पसंतीचे पेमेंट माध्यम म्हणून उदयास आले आहे. व्हॉल्यूमच्या दृष्टीने पहिले तर त्याचा बाजारातील हिस्सा 64 टक्के आणि मूल्याच्या दृष्टीने 50 टक्के आहे.
UPI म्हणजे काय ???
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही एक रिअल-टाइम पेमेंट सिस्टीम आहे. ज्याद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात लगेच पैसे ट्रान्सफर करता येतात. विशेष म्हणजे यूपीआय द्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करता येतात.
UPI सिस्टीम कसे काम करते ???
यूपीआय अगदी सहजपणे वापरता येते. यासाठी मोबाईलमध्ये गुगल पे, पेटीएम, फोनपे सारखे कोणतेही यूपीआय App डाउनलोड करावे लागेल. यानंतर बँक खाते या यूपीआय App शी लिंक करून ही सिस्टीम वापरता येईल. एकापेक्षा जास्त बँक खाते यूपीआय App शी लिंक करता येतील. याबरोबरच एका यूपीआय App द्वारे अनेक बँक खाती देखील ऑपरेट करता येतात.
फोनसाठी यूपीआयची नवीन आवृत्ती
हजारो फीचर फोन युझर्सना डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये आणण्यासाठी RBI ने अलीकडेच यूपीआयची नवीन आवृत्ती UPI 123Pay लाँच केली आहे. UPI 123Pay द्वारे आता ज्या युझर्सकडे इंटरनेटसह स्मार्टफोन नाही त्यांना देखील यूपीआय ट्रान्सझॅक्शन करता येतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
हे पण वाचा :
Credit Card चे लिमिट वाढवण्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या
अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!
GST कौन्सिलच्या बैठकीत Cryptocurrency बाबत काय निर्णय झाला ??? जाणून घ्या
Investment : मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Income Tax Return भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत??? समजून घ्या