हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Senior Citizen Care FD) एचडीएफसी बँक ही देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक कायम आपल्या ग्राहकांच्या फायद्याचा विचार करत असते. त्यामुळे HDFC च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या आणि चांगल्या योजना सुरु केल्याचे पहायला मिळाले आहे. मुख्य म्हणजे, ही बँक आपल्या ग्राहकांना परवडेल अशा इंटरेस्ट रेटवर विविध कर्ज उपलब्ध करून देते.
तसेच एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून एफडी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स दिले जातात. अशातच या बँकेत FD करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. (Senior Citizen Care FD) HDFC बँकेच्या एका स्पेशल FD योजनेत गुंतवणूक करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे आणि त्यामुळे या बँकेत एफडी करणाऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
HDFC बँकेची स्पेशल FD योजना (Senior Citizen Care FD)
HDFC बँकेच्या माध्यमातून सिनिअर सिटीजन केअर FD ही विशेष योजना लाँच करण्यात आली आहे. ही योजना सिनिअर सिटीजन अर्थात वयोवृद्ध ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ ग्राहकांना ७.७५% इतके व्याजदर दिले जात आहे. तसेच सामान्य एफडीच्या तुलनेत अधिक परतावादेखील दिला जात आहे. माहितीनुसार, या योजनेत ५ कोटी किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या गुंतवणुकीसाठी हा व्याजदर लागू राहणार आहे.
गुंतवणूक आणि कालावधी
ज्येष्ठ ग्राहकांना HDFC च्या स्पेशल FD योजनेत गुंतवणूक करताना किमान ५,००० रुपये ते कमाल ५ कोटी रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. (Senior Citizen Care FD) तसेच या योजनेत किमान ५ वर्षे आणि १ दिवस ते जास्तीत जास्त १० वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. यामध्ये मासिक किंवा त्रैमासिक स्वरूपात व्याज दिले जाईल.
गुंतवणूक मुदतीत वाढ
HDFC बँकेने याच विशेष एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुदत वाढवल्याचे समोर आले आहे. यानुसार HDFC बँकेमध्ये ज्येष्ठांना या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर वाढवलेल्या मुदतीनुसार २ मे २०२४ पर्यंत गुंतवणूक करता येईल. अर्थात आता ज्येष्ठ ग्राहकांना या स्पेशल FD मध्ये येत्या २ दोन मे पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. (Senior Citizen Care FD) त्यामुळे ज्येष्ठांसाठी बँकेचा हा निर्णय चांगला फायद्याचा ठरणार असल्याचे दिसत आहे.