हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Senior Citizen FD Rates : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या Canara Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
18 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
Canara Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, 18 जानेवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. आता, कॅनरा बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सर्वसामान्यांना 3.25 टक्के ते 7.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25 टक्के ते 7.65 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे. Senior Citizen FD Rates
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सर्वाधिक 7.75 टक्के व्याज
Canara Bank एफडीच्या 400 दिवसांच्या नवीन कालावधीच्या FD वर 7.15 टक्के व्याज मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 7.65 टक्के व्याज मिळेल. त्याच प्रमाणे ₹15 लाखांपेक्षा जास्त परत न करण्यायोग्य डिपॉझिट्सवर, बँकेकडून सर्वसामान्यांना सर्वाधिक 7.45 टक्के आणि 400 दिवसांच्या कालावधीसह ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर मिळेल.
त्याच वेळी, 666 दिवसांसाठी सर्वसामान्यांना 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के दिले जाईल. 3 वर्षांपेक्षा कमी मात्र 2 वर्षांहून जास्त दिवसांच्या FD वर, सर्वसामान्यांना 6.8 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.3 टक्के व्याज दर मिळेल. तसेच 3 वर्षे आणि 5 वर्षांपेक्षा कमी दिवसांसाठी सर्वसामान्य नागरिकांना 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7% व्याज दिले जाईल. त्याच प्रमाणे 5 वर्षे आणि 10 वर्षांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 6.5% तर ज्येष्ठ नागरिकांना 7% व्याज दिले जाईल. Senior Citizen FD Rates
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Senior Citizen FD Rates
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Senior Citizen FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=9
हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!