Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Kisan Credit Card : आता लवकरच संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्र सरकारकडून सर्व सरकारी बँकांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ साठीची प्रक्रिया सोपी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी डिजिटायझेशनची मदत घेण्यासही सांगितले आहे. यासोबतच पीएम किसानची मदत घेण्याचे आवाहनही सरकार कडून यावेळी केले गेले आहे. ज्यामुळे आता येत्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँका किसान क्रेडिट कार्ड देण्यास सुरुवात करतील, असे म्हंटले जात आहे. जर आपणही शेती करत असाल तर या संधीचा फायदा नक्कीच घ्या. मात्र, किसान क्रेडिट कार्डसाठी आपल्याकडे तीन कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Modi government extend date for payment of loan under kisan credit card kcc  till 30 june | किसान क्रेडिट कार्ड को लेकर मोदी सरकार ने लिया बड़ा फैसला,  किसानों को मिलेगी राहत |

कोणती कागदपत्रे द्यावी लागणार ???

Kisan Credit Card मिळविण्यासाठी आपल्याकडे आधार, पॅन आणि फोटो कॉपी असणे आवश्यक आहे. याद्वारे आपण खरोखरच शेतकरी असल्याचे स्पष्ट होईल. याबरोबरच आपल्याकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाईल. याद्वारे आपले कोणत्याही बँकेत कर्ज थकीत नसल्याचे कळून येईल.

Kisan Credit Card चे फायदे जाणून घ्या

केंद्र सरकारच्या नियमांनुसार याद्वारे शेतकऱ्यांना फक्त 7 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. तसेच वेळेवर पैसे परत केल्यास 3% अतिरिक्त सूट देखील मिळेल. अशा प्रकारे प्रामाणिक शेतकर्‍यांना फक्त 4% व्याजाने पैसे मिळतील.

Kisan Credit Card Scheme - Agri learner

Kisan Credit Card चे इतर फायदे जाणून घ्या

याद्वारे 1.60 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही गॅरेंटीची गरज नसते.
KCC मधून शेतीशी संबंधित गोष्टी खरेदी करता येतील. तसेच नंतर पीक विकून कर्जाची परतफेड करता येईल.
आता KCC घेतल्यावर पीक विमा काढणे ऐच्छिक केले गेले आहे.
डेअरी आणि मत्स्यव्यवसायासाठी देखील KCC आता उपलब्ध आहे.

Kisan Credit Card कोणाकोणाला घेता येईल ???

कृषी, पशुपालन आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला KCC घेता येते.
त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या व्यक्तीला देखील याचा फायदा घेता येईल.
यासाठीचे कमीत कमी वय 18 वर्षे तर जास्तीत जास्त 75 वर्षे असावे.
जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सह-अर्जदार आवश्यक असेल, मात्र त्याचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे लागेल.

Kisan Credit Card Loan Scheme : यहाँ जानें कैसे मिलेगा लोन सम्पूर्ण  प्रक्रिया

क्रेडिट कार्ड कसे मिळवावे ???

एसबीआयसहीत देशातील बहुतेक सरकारी बँकांमध्ये किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.
यासाठी आवश्यक कागदपत्रांसहीत फॉर्म भरून बँकेच्या शाखेत अर्ज देता येतो.
किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकरी ऑनलाइन फॉर्म देखील भरू शकतात.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता