व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जेष्ठ काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे निधन

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जेष्ठ कायदेतज्ञ, गांधीवादी आणि माजी मंत्री एडवोकेट हुसेन दलवाई (Advocate Hussein Dalwai) यांचे आज मुंबईत वयाच्या 99 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. चर्चगेट येथील इम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एड्वोकेट हुसेन दलवाई (Advocate Hussein Dalwai) यांनी 16 वर्षे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात ते कायदे मंत्री होते. एड्वोकेट हुसेन दलवाई यांच्या माघारी मोठा मुलगा दिलावर, फिरोज, मुश्ताक ,रेहाना आणि शहनाज या दोन मुली आहेत.

हुसेन दलवाई यांची कारकीर्द
हुसेन दलवाई यांचा जन्म 17 ऑगस्ट 1922 मध्ये चिपळूण तालुक्यातील मिरोली गावात जन्म झाला. त्यांनी बीए, एलएलबीचे शिक्षण घेतले. 1940 ते 1946 या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय सेवा दलासोबत काम केले. 1952 मध्ये त्यांचा राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाशी संबध आला. यानंतर त्यांनी आयुष्यभर काँग्रेस विचारधारेसोबत निष्ठा ठेवली. एड. हुसेन दलवाई हे उत्तम कायदेपटू होते. अनेक दशके त्यांनी बॉम्बे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कायद्याची प्रॅक्टीस केली.

एड्वोकेट हुसेन दलवाई (Advocate Hussein Dalwai) यांचे दिवंगत यशवंतराव चव्हाण ,वसंतदादा पाटील ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार या नेत्यांसोबत त्यांचे अतिशय जवळचे संबध होते. मुंबईतील यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठाणशी ते जूळून होते. अनेक आंतराष्ट्रीय परिषदेत त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनीधीत्वसुद्धा केले होते. एड्वोकेट हुसेन दलवाई यांनी नव कोकण शिक्षण संस्था, चिपळूणचे अध्यक्षपद, भारत सेवक समाजचे संचालकपद, 1962-78 मध्ये ते विधानसभा सदस्य राहिले आहेत, तसेच एप्रिल 1984 मध्ये ते राज्यसभेचे सदस्यदेखील राहिले आहेत.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल