हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसांवर आशिया चषक येऊन ठेपला आहे. या चषकासाठी विराट कोहली, लोकेश राहुल या स्टार फलंदाजांच्या पुनरागमनाची चाहूल चाहत्यांना लागली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी BCCI लवकरच आपला संघ जाहीर करणार आहे. अशात भारताला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा आशिया चषक खेळणार नाही आहे. त्याची पाठ दुखत आहे आणि त्याला (Jasprit Bumrah) त्यातून सावरण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. अद्याप याबाबत BCCI कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Senior India fast bowler Jasprit Bumrah ruled out of Asia Cup due to back injury
— Press Trust of India (@PTI_News) August 8, 2022
”बुमराहला (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखण्याने सतावले आहे आणि तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही. तो भारताचा प्रमुख गोलंदाज आहे आणि आगामी T-20 वर्ल्ड कप लक्षात घेता त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. दुखापतग्रस्त असूनही त्याला आम्हाला आशिया चषक स्पर्धेत खेळवायचे नाही,”असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
27 ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
28 ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
30 ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह (सायंकाळी 7.30 वाजता)
31 ऑगस्ट – भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
1 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
2 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह (सायंकाळी 7.30 वाजता)
3 सप्टेंबर – B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह (सायंकाळी 7.30 वाजता)
4 सप्टेंबर – A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
6 सप्टेंबर – A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
7 सप्टेंबर – A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
8 सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
9 सप्टेंबर – B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
11 सप्टेंबर – अंतिम सामना, दुबई (सायंकाळी 7.30 वाजता)
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???