हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही कधी तुमच्या गाडीत पेट्रोल भरायला गेलात तर तुम्हाला पेट्रोल पंपावर दोन प्रकारच्या पेट्रोलची सुविधा देण्यात येते. कोणत्याही पेट्रोल पंपावर दोन प्रकारचे पेट्रोल दिसते. एक असते साधे पेट्रोल जे खूप सामान्य असते आणि दुसरे पेट्रोल म्हणजे ज्याला कंपनीने पॉवर पेट्रोल देखील म्हणते. प्रत्येक पेट्रोलियम कंपनीने पॉवर फ्युएलची वेगवेगळी नावे ठेवली आहेत. जसे हिंदुस्थान पेट्रोलियमने पॉवर पेट्रोल, भारत पेट्रोलियमने स्पीड पेट्रोल आणि इंडियन ऑइलने एक्सट्रा प्रीमियम असे नाव दिले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि पॉवर पेट्रोलने गाडीच्या मायलेज मध्ये काही फरक पडतो का ? चला याबाबत आपण जाणून घेऊया….
खरं तर पेट्रोलमध्ये असलेल्या ऑक्टेननुसार त्याची विभागणी केली जाते. पॉवर पेट्रोलचा ऑक्टेन नंबर हा सामान्य पेट्रोलच्या तुलनेत थोडा जास्त असतो. सामान्यतः, सामान्य पेट्रोलचा ऑक्टेन क्रमांक 87 ते 89 दरम्यान असतो तर पॉवर पेट्रोलचा 91 ते 93 दरम्यान असतो. ऑक्टेन क्रमांक जास्त असल्याने त्याची किंमत चार ते पाच रुपये जास्त असते. हाय ऑक्टेन पेट्रोलचा फायदा म्हणजे ते इंजिनमध्ये येणारा आवाज कमी होतो. तसेच इंजिनच्या लाईफ वर त्याचा मोठा परिणाम पडतो. पॉवर पेट्रोल इंजिनला नौकिंग पासून वाचवते. पॉवर पेट्रोल इंजिनमध्ये कोणत्याही निरुपयोगी पदार्थांची निर्मिती रोखते आणि इंजिनला पूर्ण क्षमतेने काम करण्यास मदत करते.
गाडीच्या मायलेज वर काय परिणाम होतो??
पॉवर पेट्रोलमुळे गाडीच्या इंजिनची कार्यक्षमता आणि मायलेज दोन्ही वाढतात हे खरं आहे पण त्यासाठी आपण गाडी योग्यरीत्या चालवणे देखील तितकंच महत्त्वाचे आहे, अन्यथा पॉवर पेट्रोलचा पण फारसा उपयोग होत नाही. साध्या पेट्रोलपेक्षा ४-५ रुपये जास्त देऊन पॉवर पेट्रोल खरेदी करणे आपल्याला वायफळ आणि अनावश्यक खर्च वाटतो पण गाडीच्या चांगल्या कामगिरीसाठी आणि पर्यावरणासाठी प्रीमियम पेट्रोल वापरणे केव्हाही चांगले. पॉवर पेट्रोल यासाठीही महत्वाचे आहे कारण ते इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारची घाण जमा होण्यापासून रोखते आणि इंजिनला वर्षानुवर्षे सुरळीत चालू ठेवते.