मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दूरदर्शनवर पहिले वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द गाजविणारे हे डॉ. विश्वास मेहेंदळे (vishwas mehendale) यांचे सकाळी मुलुंड येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मागच्या 2-3 महिन्यांपासून ते आजारी होते. डॉ. मेहेंदळे (vishwas mehendale) गेले काही दिवस मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते. त्याच ठिकाणी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सोमवारी मुलुंड या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांचा माध्यमांशी स्नेहाचा धागा जुळला. अमोघ वक्तृत्वासाठी प्रसिध्द असलेल्या डॉ. मेहेंदळे (vishwas mehendale) यांनी नाटकातसुद्धा काम केले आहे. एकच प्याला, नांदा सौख्य भरे, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन अशा विविध नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘मला भेटलेली माणसे’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम त्याकाळी खूप लोकप्रिय होता.
विश्वास मेहेंदळे (vishwas mehendale) यांनी साहित्यिक म्हणूनदेखील स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा एकूण 18 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केले होते. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकपददेखील भूषवले होते.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!