बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित करत गरोदर केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवनेतेचे उपनेता रघुनाथ कुचिक याच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या 2 वर्षापासून सदर तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत पुण्यात आणि गोव्यात नेवून शरीरसंबंध ठेवले. तसेच संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात करायला लावला असे आरोप कुचिक यांच्यावर करण्यात आले आहेत. . हा प्रकार 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे

या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, यासंदर्भात अद्याप शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.