हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अभ्यासू संशोधक असणाऱ्या हरी नरके (Hari Narke) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण साहित्यक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरी नरके यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. एक अभ्यासू संशोधक, विचारवंत, प्रसिद्ध लेखक, व्याख्याते अशी हरी नरके यांची ओळख होती.
हरी नरके यांनी लिहलेली महात्मा फुले यांची बदनामी आणि महात्मा फुले (शोधाच्या नव्या वाटा) ही पुस्तके सर्वात जास्त गाजली आहेत. हरी नरके यांची उत्तम मराठी ब्लॉगर अशी ही ओळख होती. ते फेसबुक या माध्यमातून सतत वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करत होते. मुख्य म्हणजे, त्यांच्याकडे समता परिषदेचे उपाध्यक्ष पद होते. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पत्रकार राजू परुळेकर यांनी हरी नरके यांची बहुजनवाद की ब्राह्मणवादाचा इतिहास या विषयावर मुलाखत घेतली होती. त्यानंतर आज थेट हरी नरके यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. हरी नरके यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
दरम्यान पुणे विदयापिठातील महात्मा फुले अध्यासनाचे हरी नरके प्राध्यापक होते. तसेच ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील राहिले आहेत. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यामध्ये त्यांचा मोलावा वाटा आहे. मुक्य म्हणजे, मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमण्यात आलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे. आज त्यांच्या जाण्याने साहित्य, कला, सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील मंडळी हळहळ व्यक्त करत आहे. अनेकजणांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून हरी नरके यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीवर दुख व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर करत, मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले असे म्हटले आहे. शरद पवारांबरोबर रोहित पवार, अमोल कोल्हे यांनी देखील ट्विट करत, हरी नरके यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय… pic.twitter.com/hlyv43Gw64
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 9, 2023