औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर खातेवाटपसुद्धा जाहीर झाले. मात्र बंडाच्या पहिल्या दिवसापासून सोबत असलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी आज पुन्हा एकदा ‘साला, आज सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’ असे भर सभेत म्हणत आपली नाराजी बोलून दाखवली.
'साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही', संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली pic.twitter.com/ewIyzjrKz1
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 21, 2022
काय म्हणाले संजय शिरसाट ?
‘अतुल सावे यांच्या वडिलांसोबत मी काम केलं होतं. त्यांच्या वडिलांसोबत काम करत असताना अतुल सावे हे राजकारणामध्ये येतील असं कधी वाटलं नव्हतं. पण, राजकारणामध्ये आला काय, कॅबिनेटमंत्री झाला काय, सगळंच झालं आहे. अरे आमच्याकडे तरी पाहात जा. साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, असं म्हणत शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
औरंगाबाद जिल्ह्यातून भाजपचे नेते अतुल सावे, शिंदे गटातून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले. पण शिरसाट यांना मात्र मंत्रिपद मिळू शकले नाही. शिंदे सरकारकडून सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा विस्तार होणार आहे. त्यामध्ये आपल्याला सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे, असं खुद्द शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी सांगितले आहे त्यामुळे आता त्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात संधी मिळणार की नाही, हे पाहण्याचे महत्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर