हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यामध्ये सध्या मेट्रोला (Pune Metro) प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पूण्यातील महत्वाच्या ठिकाणी मेट्रो लाईन टाकण्याचे काम सध्या जोरदार सुरु आहे. त्यातच आता येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत स्वतंत्र फिडर सेवा असणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे ही जोरदार सुरु असून या मार्गीकेसोबतच येथे लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने पादचार्यांसह, विमानतळ तसेच नगररस्त्याने जाणार्या खासगी तसेच एसटीच्या बसेससाठी स्वतंत्र बस वे उभारले जाणार आहेत. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत स्वतंत्र फिडर सेवा असणार आहे.
येरवडा ते पुणे विमानतळ चालवली जाणार फिडर बस
येरवडा मेट्रो स्थानकाच्या दोन्ही बाजूला सरकते जिने म्हणजेच एस्केलेटर, लिफ्ट आणि पादचारी जिने बसवले जाणार आहेत. पुणे विमानतळ हे येरवडा मेट्रो स्थानकापासून 4.8 किमी अंतरावर आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाश्यांसाठी मेट्रो जवळ व्हावी यासाठी या दोन्ही अंतरावर फिडर बस सेवा पीएमपीएमएलच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच प्रवाश्यांना या दोन्हीचा फायदा होणार आहे.
PMPML व MSRTC बसचा असेल थांबा
विमानतळवरून येणाऱ्या लोकांसाठी एकूण दोन थांबे बसवले जाणार आहेत. त्यामध्ये PMPML व MSRTC च्या बसेसचा समावेश असणार आहे. हे थांबे मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच वार्ड ऑफिसच्या बाजूला महापालिकेच्या जागेवर असणार आहेत. त्यामुळे याचा फायदा प्रवाश्यांना होणार आहे. तसेच वाहतुकीलाही याचा फायदा होईल.