कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
ज्या कोरोना रूग्णांची घरी स्वतंत्र विलिगीकरणाची सोय नाही, अशा रूग्णांसाठी पालिकेच्या वतीने विलिगीकरण कक्ष सुरू केल्याची माहीती निव्वळ प्रसिध्दीसाठी नगराध्यक्षांनी केलेला राजकिय स्टंट आहे. अशा प्रकारे कोणताही कक्ष पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला नाही, अशा शब्दात उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी नगराध्यक्षांनी काल केलेल्या विलिगीकरण कक्षाच्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण करून नगराध्यक्षांनी केलेल्या घोषणेतील हवा काढुन घेतली.
नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेवुन पालिकेच्या वतीने नाममात्र शुल्क आकारून विलिगीकरण कक्ष सुरू केला आहे, असे स्पष्ट केले होते. या विलिगीकरण कक्षात नागरीकांनी प्रवेश घेवून पालिकेने उपलब्ध केलेल्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन नागरीकांना केले होते. या संदर्भात पालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी स्पष्टीकरण केले. ते म्हणाले की, आज काही वर्तमान पत्रात पालिकेच्या वतीने विलिगीकरण कक्षाची सुरूवात केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. या संदर्भात आज मी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे बरोबर चर्चा केली. या विलिगीकरण कक्षाची माहीती विचारली पालिकेचा हा कक्ष कोठे आणि केव्हा पासुन सुरू करण्यात आला. तेव्हा मुख्याधिकारी यांनी मला सांगितले की, अशा प्रकारे पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचा विलिगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला नाही. नगराध्यक्षांनी सुरू केलेल्या विलिगीकरण कक्षाशी पालिकेचा काहीही संबंध नाही. मुख्याधिकारी यांनी दिलेली माहीती बरोबर आहे का नगराध्यक्षांनी दिलेले वृत्त खरे आहे, असा प्रश्न उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी उपस्थित केला.
मुख्याधिकारी या शासनाच्या प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्या जे माहीती देतील तीच माहीती अधिकृत आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी दिलेले वृत्त खोटे व निव्वळ प्रसिध्दीसाठी केलेला राजकिय स्टंट आहे. नगराध्यक्षांनी आजवर केलेल्या अनेक खोटया घोषणां पैकीच ही एक घोषणा आहे. त्यांची विश्वासाहर्ता आता राहिलेली नाही. फसवी घोषणा करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु आता अशा फसव्या घोषणेला नागरिक फसणार नाहीत, हे नगराध्यक्षांनी लक्षात घ्यावे. असा टोलाही उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी लगावला. या वेळी नगरसेवक रविंद्र कुंभारदरे, प्रकाश पाटील व तौफिक पटवेकर हे देखिल उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा