हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सीरमने राज्य सरकारसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी आपल्या लसीचे दर जाहीर केले. या प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. तसेच एकाच लसीचे वेगवेगळे दर का? असा सवाल उपस्थित केला असताना आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी थेट सिरमलाच असाच सवाल विचारलाय कि केंद्राला हि लस दीडशे रुपयांना मग आम्हाला चारशे रुपयांमध्ये का देताय? याच सिरमणी उत्तर द्यावं.? असा सवाल विचारीत सिरमच्या या प्रकाराबाबत मलिक यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज परभणी जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी आज शहरातील आयटीआय इमारतीतील शासकीय कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
नवाब मलिक सीरमच्या या निर्णयावर आक्षेप घेत म्हणाले, ‘केंद्र, राज्य आणि खासगी लोकांना देण्यात येणाऱ्या लसीच्या दरांमध्ये ही तफावत का आहे, याचं उत्तर ‘सीरम’कडून राज्य सरकारला आणि जनतेला हवं आहे. ‘लसीच्या उत्पादन खर्च हा एकच असतो. मग वेगवेगळ्या ग्राहकांसाठी दर वेगवेगळे का? केंद्राला दिली जाणारी लस टॅक्स फ्री आहे का? राज्यासाठी आणि जनतेसाठी वेगळा टॅक्स वगैरे आहे का,’ याचं उत्तर सीरमकडून मिळणं अपेक्षित आहे,’
तसेच राज्यातील नागरिकांना जगातील सर्वात चांगली आणि स्वस्त लस व औषधे मिळावीत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी एक समिती नेमली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात याबाबत चर्चा झाली आहे. निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, राज्यातील नागरिकांना आवश्यक ती औषधे राज्य सरकार लवकरच खरेदी करेल,’ असं मलिक यांनी यावेळी सांगितलं.