ओडिशातील सात गावे नकाशावरुन होत आहेत गायब; येथे एकेकाळी राहत होती 700 कुटुंबे! जाणून घ्या काय झाले त्यांच्यासोबत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यात 17 km कि.मी.पर्यंत पसरलेल्या ह्या परिसरात काही वर्षांपूर्वीपर्यंत सुमारे 700 कुटुंबे राहत होती. आणि आता ते पूर्णपणे वाळवंटात बदलले आहे. परिसरात सर्वत्र वाळूच वाळू दिसते. पूर्वीच्या काही गोष्टी अजूनही समुद्रकाठच्या जवळच असलेल्या या भागात पाहिल्या जातात, वाळूत रुतलेला हँडपंप, भटके प्राणी, खजूरची झाडे आणि मूर्ती नसलेले एक जुने मंदिरही या ठिकाणी उपस्थित आहेत. हे मंदिर परिसरातील लोकांना बसण्यासाठी चांगले ठिकाण होते.

इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार ही कथा सातभायाची असून जो गावांचा समूह आहे. हा भाग समुद्राच्या धक्क्यामुळे नकाशावरून जवळजवळ नाहीसा झाला आहे. आणि इथल्या लोकांचे जीवनमानही नष्ट झाले आहे. आज फक्त एकच व्यक्ती प्रफुल्ल लेन्का या भागात नियमित येतो. 2018 मध्ये, लेन्काचे 6 सदस्यीय कुटुंब हे 571 लोकांपैकी होते, ज्यांना जिल्हा प्रशासनाने बागपतिया येथील कॉलनीत पुनर्वसन केले. वीज आणि स्वच्छ पाणी नसतानाही 40 वर्षांची लेन्का आपल्या 20 म्हशी बघायला येथे येत असतात. वृत्तपत्र अहवालानुसार उर्वरित 148 कुटुंबांपैकी 118 कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उर्वरित 30 कुटुंबांसाठी कागदी कामे अजूनही केली जात आहेत.

केंद्रापाडाचा 31 किमी भाग समुद्राने गिळला:
रहिवासी प्रभाकर बेहेरा (वय 61) सांगतात की, “सुमारे 6 वर्षांपूर्वी माझी २ एकर जमीन वांझ बनली. पुनर्वसनानंतर माझे कुटुंब बागपतियात गेले, परंतु मी येथे परत आलो कारण आपल्या सर्वांना १० डिसमिल प्लॉटवर जगणे खूप अवघड आहे. माझ्या मोठ्या मुलाने केरळमधील प्लायवुड कारखान्यात काम सुरू केले आहे. माझा छोटा मुलगाही अभ्यासानंतर त्याच्याबरोबर जाईल’. नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्चच्या अभ्यासानुसार 1990 ते 2016 च्या दरम्यान ओडिशाने आपल्या 550 कि.मी. च्या किनारपट्टीवरील 28 टक्के भाग गमावला आहे. ज्यामध्ये केन्द्रापाडाचा केवळ 31 किमीचा भाग संपला आहे. सातभया हे आज बेट बनले आहे.

Leave a Comment