पवार माझे बाप म्हणायचं, अशोभनीय वक्तव्यही करायचं, रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर टीकेचा भडीमार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात शोषलं मीडियातुन एकमेकांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. दोघींत सध्या सोशल मीडियावर वॉर रंगले आहे. कालो वाघ यांनी टीका केल्यानंतर आज पुन्हा चाखणकर यांनी वाघ यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.

‘ एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर शरसंधान साधले आहे.

“राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण? याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन.” अशा शब्दात नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा देताना चाकणकरांनी चित्रा वाघ यांना अप्रत्यक्षपणे झापलं.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली होती. चित्रा वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकरांनाही प्रखरपणे उत्तर दिले. “ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!” अशा शब्दात चाकणकर यांनी सुनावलं होतं.

You might also like