पुण्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |पुण्यात दापोडी आणि भोसरी भागातसुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी ‘पर्दाफाश’ केला आहे. सापळा लावून आरोपींना जाळ्यात पकडून पोलिसांनी तीन मुलींची  देह विक्रीच्या व्यवसायातून सुटका केली आहे. सदरची कार्यवाही मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास केली असल्याची माहिती  पोलिसांनी माध्यमांना दिली.

या सेक्स रॅकेट प्रकरणात पोलीसांनी रेणू रमेश भाटिया (६३, रा. दापोडी), पेपसिंह शेतानसिंह (२५, रा. दापोडी, मूळ रा. राजस्थान), रमेश शिवाजी सूर्यवंशी (२७, रा. थेरगाव मूळ रा. लातूर), बंडू उत्तम चव्हाण (२५, रा. सुसगाव, मूळ रा. नांदेड), मारुती बळीराम शिंदे (३५, रा. रहाटणी मूळ रा. बीड) या आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तीन मुलींची देह विक्रीच्या विळख्यातून मुक्तता केली आहे.  दापोडी मधील मंत्री निकेतन परिसरात  हा सर्व प्रकार चालू होता अशी माहिती  देखील पोलिसांनी दिली आहे.