अहमदनगर प्रतिनिधी | कर्तव्य बजावताना पोलीसांना कसल्याही प्रसंगाला तोंड द्यावे लागू शकते याचा प्रत्येय आज अहमदनगरमध्ये आला आहे. अहमदनगरमधील औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यांवरील पंढरीपूल येथे सेक्स रॅकेटचा पडदा फाश पोलिसांच्यावर सेक्स रॅकेटमध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यांच्या डोक्यात दगड लागल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे.
सिद्धार्थ घुसळे आणि अजय वडते अशी जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नवे असून या ठिकाहून पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. अन्सार गफूर शेख, वजीर नजीर शेख, मन्सूर रहिमनभाई पठाण,बाबा निजाम शेख , गंगाराम जानकू काळे , रशीद सरदार शेख अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांना अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले त्यावेळी त्या ठिकाणावरून गंगाराम जानकू काळे , रशीद सरदार शेख या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाताना या दोघांनी पोलसांवर दगडफेक केली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच ५ महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्याच प्रमाणे ३ ग्राहकांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.