मतिमंद महिलेवर लैंगिक अत्याचार; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एका मतीमंद महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी या या घटनेतील संशयित आरोपी म्ह्णून एकाला ताब्यात घेतला आहे. अर्जून दिगंबर शितोळे असं या संशयित आरोपीचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर मधील एका मतिमंद महिलेवर काही नराधमांनी लैगिक अत्याचार केले. या घटनेची माहिती काही नागरिकांना समजली असता त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यामाहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि या घटनेतील संशयित आरोपी म्हणून त्यांनी अर्जून दिगंबर शितोळे या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच घटनेचा पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील खरा आरोपी कोण याचा शोध घेणं सुरु असून या घटनेचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.

Leave a Comment